Gold Rate Today सोने चांदीचे भाव गगनाला भिडणार, चांदीचे भाव एका दिवसात तब्बल एवढ्या रुपयाने वाढले.

Amandeep Singh
Gold Rate Today
WhatsApp Group Join Now

Gold Rate Today : काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने-चांदीच्या भावात भरपूर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून स्थानिक बाजारपेठेवर दिसत आहे. गेले 2 दिवस सोन्याचे भाव स्थिर राहिल्या नंतर परत आज प्रती दहा ग्रॅम साठी चारशे रुपयांची वाढ झाली आहे.

आजचे सोन्याचे प्रति तोळा भाव ७२ हजार ६०० रुपये इतके आहेत. दुसरी बाजूला चांदी ने 1 किलो मागे एक दिवसात तब्बल १,४०० रुपयांची ‘उसळी’ घेतली आहे. त्यामुळे चांदीच्या भावामधील वाढ सर्वांना चक्रावून टाकणारी आहे. येत्या काही काळात सोने व चांदीतील ही भाव वाढ अशीच सुरू राहू शकते, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

Gold Silver Rates

काही दिवसापासून एकसंध असलेला सोन्याचा बाजार पुन्हा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. गुढीपाडव्याच्या वेळेस सोन्याचा भाव प्रति तोळा जीएसटीसहीत ७४ हजार ३६६ रुपये एवढा होता. चांदीच्या भावात मध्ये एक किलो मागे तीन हजारांची वाढ झाली असून चांदी ८५ हजार ३८७ रुपयांपर्यन्त गेला होता. येणारे दोन महिने लग्नसराई नाही. या कारणाने सोन्याची मागणी घटली. मागील काही आठवड्या पासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. सोन्याचा भाव मागील आठवड्याच्या सुरवातीला २० मे ला प्रति 10 ग्रॅमला (जीएसटी सोडून) ७४,९०० रुपये होता. त्या नंतरच्या  मंगळवारी (ता. २१) ७४,५०० रुपये झाला. मग बुधवारी (ता. २३) सोन्यात तब्बल 1 हजारांची घसरण झाली आणि भाव ७४ हजार ५०० वरून ७३ हजार ३०० वर येऊन पोहचले. गेल्या दोन-तीन दिवसा पासून  सोन्याचे भाव स्थिर राहून आज परत ४०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

Gold Rate Today चढ उतार

सोमवारी (ता. २७) प्रति १० ग्रॅमला ७२ हजार ६०० रुपयाला भाव पोहोचले. सोन्याच्या भावात दिवसा नुसार होणारे बदल हे गुंतवणूकदारांसोबत अभ्यासकांना चक्रावून टाकणारे आहेत. ” सोन्याचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीं वर अवलंबून असतात. गेल्या पंधरा दिवसामध्ये भावात सातत्याने कमी-जास्त बदल दिसून येत आहेत. त्या मुळे गुंतवणूकदारही या कडे आकर्षित झाले असून, पुढील काही दिवस भाव स्थिर राहण्याची चिन्हे कमीच आहेत.”

Silver Rate Today चांदीने वेधले गुंतवणूकदारांचे लक्ष

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सुरू असलेला उतार-चढाव, महागाईचे वाढते लक्षण, उद्योग क्षेत्रात वाढलेली प्रचंड  मागणी, या सर्व कारणांमुळे चांदीचे भाव वाढ असल्याचे जाणकार सांगत आहेत. ११ ते १५ मे च्या दरम्याने  चांदीचा भाव ८५ हजारांखाली आला. या सर्व कारणा मुळे पुढील काही दिवस चांदीचे दर उसळीच घेतील असे तज्ञ मत मांडतात.

ALSO READ- Panchayat 3 ची प्रतीक्षा आता संपणार, सीझन 4 बद्दल आला सर्वात मोठा अपडेट.

Share This Article
Amandeep Singh is a versatile writer with a diverse range of expertise, specializing in business, education, and sports journalism. With a rich background in these fields, Amandeep brings a unique perspective and valuable insights to his writing.
Leave a comment