Panchayat 3 ची प्रतीक्षा आता संपणार, सीझन 4 बद्दल आला सर्वात मोठा अपडेट.

Pradeep Sahoo
WhatsApp Group Join Now

Panchayat 3 ची सध्या सगळीकडे क्रेझ आहे. Panchayat season 3 अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. पंचायत ही अतिशय लोकप्रिय वेबसिरीज असून पहिले दोन्ही सीजनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि तिसऱ्या सीजनसाठी सुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून  येत आहे. उद्या २८ मे ला पंचायत या वेबसीरिजचा  तिसरा सीजन रिलीज होत आहे. अभिनेता जितेंद्र कुमार या सीजन मध्ये सचिवाची भूमिका साकार करत आहेत आणि ते या वेबसीरिजमधील एक महत्त्वाचे पात्र निभावत आहेत. अभिषेक त्रिपाठी असे त्यांच्या पात्राचे नाव आहे. नुकत्याच दिलेल्या इंटरव्ह्यु मध्ये जितेंद्रने  ‘पंचायत ४’ (Panchayat 4) येणार का यावर भाष्य केल आहे.

Panchayat 3 Latest Update

जितेंद्र कुमार ने दिलेल्या मुलाखतीत त्याने एक वक्तव्य केल कि, “आठ एपिसोड लिहिल्यानंतर, टीमशी चर्चा केली, त्यानंतर बदलांवर काम केले आणि मग अंतिम पटकथा फायनल करायला जवळपास आठ महिन्याचा वेळ लागला. यात भरपूर कलाकार असल्याकारणाने त्यांच्या तारखांचेही अडथळे होते. त्यात त्यांची हेल्प करावी लागते.” जितेंद्र याच्या या उत्तरामुळे सीजन ४ येणार किंवा नाही याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

पंचायत ही वेब सिरीज पूर्णपणे स्क्रिप्टवर आधारित असून त्याच्या बाबतीत कोणतीही घाई करून चालणार नव्हत नाहीतर सिरीज च्या गुणवत्तेवर परिणाम होईल अस वक्तव्य करण्यात आल. पंचायत सिरीजमधील या नव्या बदला मुळे ही सिरीज यशस्वी झाली आहे. दिग्दर्शक आणि निर्माते यांना सोबत एक ग्रामीण भारतावर सिरीज बनवायची होती आणि त्यामुळेच पंचायत जुन्या आठवणी ताज्या करत आहे. ही एक अशी वेबसिरीज आहे जी सगळ्या कुटूंबा सोबत प्रेक्षक आनंद घेऊ शकतात, असं जितेंद्रने दिलेल्या इंटरव्ह्यु मध्ये सांगितलंय.

Panchayat 3 Cast

जितेंद्र शिवाय रघुबीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय, दुर्गेदुर्गेश कुमार, फैजल मलिक आणि सान्वीका यांच्या या मुख्य भूमिका बजावत आहेत. या वेबसीरिजसाठी जितेंद्रने प्रत्येक एपिसोडसाठी सत्तर हजार रुपये मानधन घेतलल आहे. तर नीना गुप्ता व रघुबीर यादव यांनी प्रतेकी पन्नास हजार रुपये व चाळीस हजार रुपये मानधन प्रत्येक एपिसोडसाठी दिले गेले आहे.

ALSO READAditi Rao Hydari : फ्रांस कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘हिरामंडी’ मधल्या बिब्बोजानचा जलवा, आदितीचा फ्रान्समध्ये ‘गजगामिनी वॉक’

Share This Article
Pradeep Sahoo is a seasoned writer and a prominent voice in the realm of technology, entertainment, and sports journalism at Live 4 News. With a passion for exploring the latest trends and developments in these dynamic fields, Pradeep brings a wealth of experience and expertise to the Live 4 news.
Leave a comment