हवामान अंदाज (weather)- राज्यातील बहुतांश विभागात अवकाळी पाऊस पडत असला, तरी बऱ्याच भागात मात्र अजूनही उकाडा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्याचं तापमान चाळीश पार गेलंल आहे. जळगाव आणि धुळे मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत देखील चांगलाच पारा चडलेला जाणवत आहे. महराष्ट्रातील नागरिकांना कडक उन्हा पासून दिलासा मिळणार आहे. कारण, महाराष्ट्र हवामान खात्याने मंगळवारी राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update (Havaman Andaz)
पुढील ५ दिवसा मध्ये राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भ मध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात ठीकठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. राज्य हवामान (havaman) विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण व मुंबई मध्ये उष्ण व दमट वातावरण राहील. या विभागामध्ये नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला. गुजरात राज्यात उष्णतेची लाट आली आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला. उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.
दक्षिण कोकणगोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सूर्यप्रकाशाची शक्यता आहे.
Pune Weather, Mumbai Rains, Rain Today
मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या जिल्हांना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यामध्ये गारपीट होऊ शकते, असे राज्य हवामान खात्याने भाकीत केल आहे.
READ MORE – Redmi Note 13 5G सीरीज भारत हुआ लॉन्च: धमाकेदार कीमत, स्पेसिफिकेशन, लॉन्च ऑफर